'झिरो'विषयी प्रेक्षकांची उत्सुकता कायम कशी राहील याची काळजी शाहरुख खान घेताना दिसतोय. त्याची यात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात सलमाननं पाहुणा कलाकार म्हणून एक गाणं केलंय. या सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचं कळतं. ती दृश्यं करिष्मा कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत चित्रीत केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच हे चित्रीकरण झालं होतं. संपूर्ण चित्रपटामध्ये तिची दृश्यं ठळकपणे दिसावीत यासाठी एसआरके काळजी घेतोय.
श्रीदेवीची आठवण
'झिरो'विषयी प्रेक्षकांची उत्सुकता कायम कशी राहील याची काळजी शाहरुख खान घेताना दिसतोय त्याची यात मुख्य भूमिका आहे...
Maharashtra Times 28 Nov 2018, 10:26 am