अ‍ॅपशहर

किंग खानचा रेल्वेप्रवास

नेहमी विमान, आलिशान कारने प्रवास करणारा बॉलिवूडचा किंग खान चक्क रेल्वेने प्रवास करणार आहे. अर्थात, त्यालाही कारण आहे. ही सगळी धडपड तो त्याच्या आगामी 'रईस' सिनेमासाठी करतो आहे. त्याचं झालं असं की, 'रईस'च्या प्रमोशनसाठी शाहरुख खूप वेगवेगळे फंडे वापरतो आहे. यातलाच एक हा त्याचा रेल्वे प्रवास आहे.

Maharashtra Times 24 Jan 2017, 12:48 am
नेहमी विमान, आलिशान कारने प्रवास करणारा बॉलिवूडचा किंग खान चक्क रेल्वेने प्रवास करणार आहे. अर्थात, त्यालाही कारण आहे. ही सगळी धडपड तो त्याच्या आगामी 'रईस' सिनेमासाठी करतो आहे. त्याचं झालं असं की, 'रईस'च्या प्रमोशनसाठी शाहरुख खूप वेगवेगळे फंडे वापरतो आहे. यातलाच एक हा त्याचा रेल्वे प्रवास आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता मुंबई सेंट्रलहून राजधानी एक्स्प्रेसने टीम रईस थेट दिल्ली गाठेल आणि तिकडे सिनेमाचं प्रमोशन करेल. यापूर्वी आपण रेल्वेने कधी प्रवास केला होता हे शाहरुखला कदाचित आठवणारही नाही. पण आता प्रमोशनच्या निमित्ताने मात्र तो त्याच्या टीमसोबत हा प्रवास करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज