शूटिंगच्या दरम्यान कलाकारांचं सेटवर खोड्या करणंही सुरू असतं. अभिनेत्री शर्मिला राजारामचंच घ्या. 'मेरे साई' या हिंदी मालिकेच्या सेटवर गंमत करत तिचं एका बकरीला उल्लू बनवणं सुरू होतं. हा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर टाकला. सेटवर एका कोपऱ्यात या बकरीला बांधून ठेवलं होतं. शर्मिला एका बाजूला बकरीचा आवाज काढत होती. तिचा आवाज ऐकून बकरी मात्र आजूबाजूला वळून वळून बघत होती. 'इसे कहते है बकरी को उल्लू बनाना' अशी गमतीदार ओळही तिनं या व्हिडिओसाठी लिहिली होती.
शर्मिलानं बकरीला बनवलं उल्लू
शूटिंगच्या दरम्यान कलाकारांचं सेटवर खोड्या करणंही सुरू असतं. अभिनेत्री शर्मिला राजारामचंच घ्या. 'मेरे साई' या हिंदी मालिकेच्या सेटवर गंमत करत तिचं एका बकरीला उल्लू बनवणं सुरू होतं.
Maharashtra Times 11 Apr 2018, 10:38 am