'बालक पालक' या मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून चमकलेली अभिनेत्री शाश्वती पिंपळकर आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. कलर्स मराठीच्या 'चाहूल' या नव्या मालिकेत ती एक महत्त्वाची भूमिका साकारते आहे. यापूर्वी 'पक्के शेजारी' मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर मात्र तिने छोट्या पडद्यापासून लांब राहणंच पसंत केलं. मधल्या काळात तिने ‘देहभान’ हे नाटक केलं. शिवाय आणखी काही कामही तिने या काळात केलं. त्यानंतर ती आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यायला सज्ज आहे. 'चाहूल'मध्ये ती निर्मला ही व्यक्तिरेखा साकारत असून यात तिच्यासोबत अक्षर कोठारी आणि लेझान ही परदेशी अभिनेत्री दिसणार आहे.
शाश्वतीची ‘चाहूल’
'बालक पालक' या मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून चमकलेली अभिनेत्री शाश्वती पिंपळकर आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. कलर्स मराठीच्या 'चाहूल' या नव्या मालिकेत ती एक महत्त्वाची भूमिका साकारते आहे. यापूर्वी 'पक्के शेजारी' मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर मात्र तिने छोट्या पडद्यापासून लांब राहणंच पसंत केलं.
Maharashtra Times 15 Dec 2016, 12:21 am