हमारी बहन गंगा चौधरी लापता है, कृपया उसे ढुंढने में हमारी मदद करे. असं लिहीलेलं एक पत्रक अभिनेता शर्मन जोशी सध्या घेऊन फिरतोय. त्याने सोशल मिडीयावरही ते पत्रक हातात घेऊन फोटो पोस्ट केलाय. हे नेमकं काय आहे, विचारात पडलात ना? तर हे त्याच्या पुढच्या एका सिनेमाचं प्रमोशन आहे. काशी या आगामी सिनेमात तो काशी चौधरी या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. थ्री स्टोरीज या सिनेमानंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही खुशखबरच आहे.
शर्मन शोधतोय बहिणीला
हमारी बहन गंगा चौधरी लापता है, कृपया उसे ढुंढने में हमारी मदद करे असं लिहीलेलं एक पत्रक अभिनेता शर्मन जोशी सध्या घेऊन फिरतोय...
Maharashtra Times 20 Sep 2018, 4:00 am