मराठी कलाकार हिंदीत दिसणं नवीन नाही. अधिकाधिक मराठी कलाकार हिंदीमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसू लागलेत. अभिनेत्री स्पृहा जोशी लवकरच एका हिंदी चित्रपटात चमकणार असल्याचं कळतंय. अलीकडेच ती झाशीला गेली होती. तिथे ती फिरायला नव्हे तर त्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच गेली होती असं कळतं. सिनेमाचं नाव, तिची भूमिका याबद्दल अद्याप काही कळलेलं नाही. पण, चाहत्यांना तिच्या भूमिकेविषयी नक्कीच उत्सुकता असेल.
हिंदीत चमकणार
मराठी कलाकार हिंदीत दिसणं नवीन नाही अधिकाधिक मराठी कलाकार हिंदीमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसू लागलेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2019, 4:00 am