पारंपरिक आणि आधुनिक गोष्टी यातला दुवा बनायला शिवानी रांगोळेला आवडतं. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट्सवरून तरी असंच दिसतंय. म्हणूनच कदाचित तरुणाई या तरुण अभिनेत्रीची फॅशन फॉलो करते. आता अलीकडचंच उदाहरण घ्या ना. गणेशोत्सवानिमित्त शिवानीनं तिच्या आईच्या वेगवेगळ्या साड्या नेसायचं ठरवलेलं दिसतंय. त्या तिला शोभूनही दिसतायत. अर्थात, तिचं हे साडीप्रेम नवीन नसून दर सणासुदीला ती अशाच साड्या नेसत असते.
साडीप्रेम
पारंपरिक आणि आधुनिक गोष्टी यातला दुवा बनायला शिवानी रांगोळेला आवडतं. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट्सवरून तरी असंच दिसतंय.
Maharashtra Times 2 Sep 2017, 12:00 am