‘इंग्लिश विंग्लीश’पासून सेकंड इनिंग सुरू केलेली श्रीदेवी सध्या फॉर्मात आहे. तिचा ‘मॉम’ समीक्षक तसंच प्रेक्षकांनाही आवडला. अभिनयासह नृत्यकौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे. मिस्टर इंडियामधला तिचा ‘हवाहवाई’ डान्स विसरणं केवळ अशक्य. त्यामुळे एखाद्या डान्स शोची परीक्षक म्हणून ती दिसली तर? होय, जुही चावला, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या बॉलिवूड तारकांनंतर ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये ही 'मॉम' झळकणार असल्याचं समजतं. शोच्या दहाव्या सीझनमध्ये श्रीदेवी परीक्षक म्हणून दिसणार असल्याची इंडस्ट्रीत चर्चा आहे.
‘मॉम’ फॉर्मात
‘इंग्लिश विंग्लीश’पासून सेकंड इनिंग सुरू केलेली श्रीदेवी सध्या फॉर्मात आहे. तिचा ‘मॉम’ समीक्षक तसंच प्रेक्षकांनाही आवडला.
Maharashtra Times 1 Aug 2017, 2:04 am