श्वेता बसू प्रसाद आपल्याला पहिल्यांदा दिसली ती ‘मकडी’मध्ये. त्यानंतर ती ‘इक्बाल’मध्ये झळकली. मात्र २०१४ मध्ये मात्र ती एका वादग्रस्त प्रकरणात सापडली. त्यानंतर ती चंदेरी दुनियेतून गायब झाली होती. आता ती पुन्हा काम करतेय एका शॉर्टफिल्ममध्ये. तिला कसंही करून सिनेइंडस्ट्रीत परतायचं आहे. परत येण्यासाठी तिने हा लघुपटाचा पर्याय निवडल्याच बोललं जातंय. या शॉर्टफिल्ममध्ये तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह काम करतायत. याचं दिग्दर्शन अधिराज बोस करत असून, ‘इंटरेरिअर कॅफे’ असं या लघुपटाचं नाव आहे. श्वेताने पुन्हा इंडस्ट्रीत येण्यासाठी हा योग्य पर्याय असल्याचं इंडस्ट्रीतल्या जाणकारांना वाटतंय. श्वेताही या नव्या शॉर्टफिल्मबाबत खूप उत्साही असल्याचं समजतं.
पुन्हा एंट्री
श्वेता बसू प्रसाद आपल्याला पहिल्यांदा दिसली ती ‘मकडी’मध्ये. त्यानंतर ती ‘इक्बाल’मध्ये झळकली. मात्र २०१४ मध्ये मात्र ती एका वादग्रस्त प्रकरणात सापडली. त्यानंतर ती चंदेरी दुनियेतून गायब झाली होती.
Maharashtra Times 21 Jul 2016, 12:45 am