गेले काही दिवस 'रीलोड' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला अखेर काही दिवसांसाठी ब्रेक मिळाला आहे. सिनेमासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्यामुळे आता पुढचे काही दिवस तो फक्त आराम करणार असल्याचं समजतं. त्यातच काल, सोमवारी त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे हा खास दिवस त्याने त्याच्या मित्रांसोबत धमाल-मस्ती करत साजरा केला. मुंबईतच थोडा वेळ आराम करून नंतर त्यांची पार्टी रंगली होती. त्याचा आवडता चॉकलेट केक आणि मित्रांसोबत भरपूर गप्पा मारत सिद्धार्थचा यावर्षीचा वाढदिवस साजरा झाला.
वाढदिवस मित्रांसोबत
मुंबईतच थोडा वेळ आराम करून नंतर त्यांची पार्टी रंगली होती. त्याचा आवडता चॉकलेट केक आणि मित्रांसोबत भरपूर गप्पा मारत सिद्धार्थचा यावर्षीचा वाढदिवस साजरा झाला.
Maharashtra Times 17 Jan 2017, 12:18 am