कपूर्स आणि खान्स म्हणजे बॉलिवूडमधली बडी प्रस्थं. नवाब सैफ अली खान आणि त्याची बहिण सोहा अली खान ही यातलीच दोन महत्वाची नावं. काम मिळवण्यासाठी सोहा तिच्या भावावर, अर्थात सैफवर अवलंबून असते, अशा चर्चा गेले काही दिवस सुरू होत्या. पण सोहाने मात्र या गोष्टींचा साफ इन्कार केला आहे. सैफ आणि करीना या दोघांशीही माझं नातं खूप घट्ट आणि जवळचं आहे. पण कामाच्या बाबतीत मात्र मी पूर्णपणे स्वावलंबी आहे. त्यासाठी मी कोणावरही अवलंबून नाही' असं सोहा स्पष्ट करते. सोहा सध्या तिच्या आगामी '३१ ऑक्टोबर' या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे.
कामासाठी अवलंबून नाही

Maharashtra Times 29 Mar 2016, 12:12 am