'पार्च्ड', 'अँग्री इंडियन गॉडेस', 'डॉ. रखमाबाई' या चित्रपटांमधून उत्तम अभिनयाची झलक दाखवणाऱ्या अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीनं अलीकडेच एका मराठी चित्रपटातल्या गाण्यासाठी स्वतःचा आवाज दिलाय. मराठी चित्रपटासाठी तिनं पहिल्यांदाच गाणं गायलं आहे. यापूर्वी तिनं 'गुलाब गँग' या हिंदी चित्रपटासाठी एक गाणं गायलं होतं. तेव्हा तिचं कौतुक झालं होतं. आता मराठीतलं हे गाणं प्रेक्षकांना कितपत आवडतंय ते बघू या. येत्या काळात ती दिग्दर्शनही करणार आहे. एकूणच, अभिनयाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती स्वत:ला आजमावून पाहतेय.
जरा वेगळं
'पार्च्ड', 'अँग्री इंडियन गॉडेस', 'डॉ. रखमाबाई' या चित्रपटांमधून उत्तम अभिनयाची झलक दाखवणाऱ्या अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीनं अलीकडेच एका मराठी चित्रपटातल्या गाण्यासाठी स्वतःचा आवाज दिलाय.
Maharashtra Times 26 Jul 2018, 8:48 am