'ओम शांति ओम'च्या सेटवर सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सध्या धमाल करताहेत. दिवाळीविशेष भागामध्ये त्या दोघी एकत्र दिसणार आहेत. सोनाक्षी उत्तम रांगोळी काढत असल्याचं पूनम यांच्यामुळे सर्वांना समजलं. स्पर्धेचं परीक्षण करण्याबरोबरच पूनम यांनी परीक्षकांसाठी अचानक रांगोळी स्पर्धा जाहीर केली. तेव्हा सोनाक्षीनं काढलेल्या रांगोळीमुळे तिच्यातली ही रांगोळी काढण्याची कला सर्वांसमोर आली. पॅकअप झाल्यानंतर या मायलेकींनी दिवाळीनिमित्त सर्व स्पर्धकांना भेटवस्तूही दिल्या म्हणे.
रांगोळीचा दे धक्का
तेव्हा सोनाक्षीनं काढलेल्या रांगोळीमुळे तिच्यातली ही रांगोळी काढण्याची कला सर्वांसमोर आली. पॅकअप झाल्यानंतर या मायलेकींनी दिवाळीनिमित्त सर्व स्पर्धकांना भेटवस्तूही दिल्या म्हणे.
Maharashtra Times 16 Oct 2017, 12:40 am