रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो, मग औक्षण-राखी बांधणं असं सगळं पार पडतं. पण आजकालच्या व्यग्र वेळापत्रकात तेवढाही वेळ कधी-कधी मिळत नाही. अभिनत्री सोनाली कुलकर्णीचंच घ्या. तिला संदीप आणि संदेश असे दोन भाऊ आहेत. संदीप परदेशी असल्यानं संदेशसोबत ती रक्षाबंधन साजरी करते. त्याच्या काही आठवणी सांगताना ती म्हणाली, की 'मी चित्रपटसृष्टीत असल्यापासून रक्षाबंधन फारच धावत-पळत होते. कधी चित्रपटाच्या सेटवर तर कधी विमानतळावर. एकदा तर आम्ही चक्क कारमध्येच राखी बांधली होती.'
कारमध्ये बांधली राखी
त्याच्या काही आठवणी सांगताना ती म्हणाली, की 'मी चित्रपटसृष्टीत असल्यापासून रक्षाबंधन फारच धावत-पळत होते. कधी चित्रपटाच्या सेटवर तर कधी विमानतळावर.
Maharashtra Times 7 Aug 2017, 12:59 am