प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेतर्फे सोनम कपूर आणि तिची बहीण रिया यांना एका विशेष पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलं. माणुसकी जपणारे व्यावसायिक असं या पुरस्काराचं नाव आहे. हा पुरस्कार मिळाल्यानं या दोघींनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. प्राण्यांना इजा करून तयार केली जाणारी कुठलीही गोष्ट सोनम वापरत नाही. स्वतः शाकाहारी असलेल्या या बॉलिवूड स्टारनं ‘डिसेक्शन’वर असलेली बंदी काढू नका, अशा आशयाचं पत्रही पर्यावरणमंत्र्यांना लिहिलं होतं.
सोनमचं कौतुक
हा पुरस्कार मिळाल्यानं या दोघींनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. प्राण्यांना इजा करून तयार केली जाणारी कुठलीही गोष्ट सोनम वापरत नाही. स्वतः शाकाहारी असलेल्या या बॉलिवूड स्टारनं ‘डिसेक्शन’वर असलेली बंदी काढू नका, अशा आशयाचं पत्रही पर्यावरणमंत्र्यांना लिहिलं होतं.
Maharashtra Times 28 Jun 2017, 11:05 am