गरमागरम मक्कई रोटी आणि सरसों दा साग ही हजारो भारतीय लोकांची आवडती डिश. आंतरराष्ट्रीय स्टार जॅकी चॅनलाही ती चाखायची आहे. त्याला ती ऑफर केलीय बॉलिवूडस्टार सोनू सूदनं. त्याचं झालंय असं, की जॅकी करत असलेल्या एका इंडो-चायनीज सिनेमामध्ये सोनू सूद काम करतोय. सिनेमाचं नाव आहे ‘कुंग फू योगा’. या सिनेमाच्या शूटसाठी सोनू काही दिवस शांघायमध्ये राहिला होता. सोनू शाकाहारी असल्याने जॅकीने खास लक्ष घालून त्याला शाकाहारी जेवण मिळेल याची व्यवस्था केली होती. आता सिनेमाच्या शूटसाठी जॅकी भारतात येईल तेव्हा इथले चमचमीत खाद्यपदार्थ मी तुला जरुर खाऊ घालेन, असं सोनूनं त्याला आश्वासन दिलंय. त्यातही जॅकीनं चविष्ट मक्कई रोटी-सरसों दा साग खायची इच्छा जॅकीनं व्यक्त केलीय म्हणे.
मक्कई रोटी खायचीय
आता सिनेमाच्या शूटसाठी जॅकी भारतात येईल तेव्हा इथले चमचमीत खाद्यपदार्थ मी तुला जरुर खाऊ घालेन, असं सोनूनं त्याला आश्वासन दिलंय. त्यातही जॅकीनं चविष्ट मक्कई रोटी-सरसों दा साग खायची इच्छा जॅकीनं व्यक्त केलीय म्हणे.
Maharashtra Times 9 Jul 2016, 12:12 am