एक संवेदनशील अभिनेत्री अशी स्पृहा जोशीची ओळख आहे. ‘नांदी’, ‘समुद्र’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकांतून तिचा अभिनय आपल्याला पाहता आला. अभिनय करतानाच तिच्यातल्या कवयित्रीलाही तिने जपलं आहे. सोशल साइटवरही ती आपल्या चाहत्यांशी सतत संपर्क ठेवून असते. तिच्या या कामाची दखल घेऊन नाट्यपरिषदेच्या बोरिवली शाखेने तिला उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जाहीर केला आहे. यापूर्वी तिला राज्य सरकारच्या पुरस्कारासह आणखी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराने त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आह
पुरस्काराचा आनंद
एक संवेदनशील अभिनेत्री अशी स्पृहा जोशीची ओळख आहे. तिच्या कामाची दखल घेऊन नाट्यपरिषदेच्या बोरिवली शाखेने तिला उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जाहीर केला आहे.
Maharashtra Times 29 Sep 2016, 2:38 am