सर्वाधिक बघितल्या जाणाऱ्या 'कुमकुम भाग्य' या हिंदी मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. प्रग्या म्हणजेच अभिनेत्री स्रीती झा या मालिकेत लवकरच डबल रोलमध्ये दिसणार आहे. प्रग्या आणि मुन्नी अशा दोन वेगवेगळ्या वयोगटातली भूमिका ही टीव्हीस्टार साकारताना दिसेल. 'लोकांचं मन जिंकण्यासाठी आता मला दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे. तसंच प्रग्याला परत पडद्यावर आणण्यात आल्यानं प्रेक्षक किती खुश आहेत हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे' असं स्रीती आत्मविश्वासानं सांगते.
आता दुप्पट मेहनत
तसंच प्रग्याला परत पडद्यावर आणण्यात आल्यानं प्रेक्षक किती खुश आहेत हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे' असं स्रीती आत्मविश्वासानं सांगते.
Maharashtra Times 28 Aug 2017, 12:37 am