सनी पवार हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. जो-तो सनीसोबत काम करायला आतुर आहे. या मुलाने आणखी एका सिनेमात काम केलंय. त्या सिनेमाचं नाव आहे ‘लव सोनिया’. या सिनेमाचं शूट पूर्ण झालंय. यात सनीबरोबर आहे रिचा चढ्ढा. या सिनेमाचं प्रमोशन एव्हाना सुरू झालंय. सनीबाबत बोलताना रिचा खूपच खुलते. ‘सनीसोबत काम करताना उत्साह असतो. तो सेटवर असल्यामुळे खूप गमतीजमतीही घडल्या’, असं ती सांगते. अर्थात आता ती हे सांगणारच. कारण सनी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलाय.
सनीचे गुणगान
‘सनीसोबत काम करताना उत्साह असतो. तो सेटवर असल्यामुळे खूप गमतीजमतीही घडल्या’, असं ती सांगते. अर्थात आता ती हे सांगणारच. कारण सनी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलाय.
Maharashtra Times 16 Mar 2017, 12:55 am