सुयश टिळक आणि सुरुची आडारकर यांच्यातला 'दुरावा' संपला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. यापूर्वी 'का रे दुरावा' या मालिकेत ही जोडी बराच काळ एकत्र दिसली. त्यानंतर त्यांचं 'स्ट्रॉबेरी' हे नाटक आलं. आता छोट्या पडद्यावर ही जोडी पुन्हा एकत्र येतेय. 'एक घर मंतरलेलं' या नव्या मालिकेमध्ये हे दोघे दिसणार आहेत. विशेष म्हणजे सुरुची यात पत्रकाराच्या भूमिकेत असेल.
सुयश-सुरुची येणार पुन्हा एकत्र
सुयश टिळक आणि सुरुची आडारकर यांच्यातला 'दुरावा' संपला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. यापूर्वी 'का रे दुरावा' या मालिकेत ही जोडी बराच काळ एकत्र दिसली.
महाराष्ट्र टाइम्स 26 Feb 2019, 8:54 am