ऑनस्क्रीन एकत्र दिसणारी जोडी पुढे खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याची काही उदाहरणं इंडस्ट्रीत पाहायला मिळतात. अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण या दोघांचा साखरपुडा अलीकडेच पार पडला. आम्हा दोघांच्या घरच्यांनी हा योग जुळवून आणला असं स्नेहा सांगते. लवकरच ही दोघं एका चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री जमली होती म्हणे. स्नेहानं सोशल मीडियावर फोटो टाकत त्यांच्या साखरपुड्याची माहिती दिली.
जोडी जमली
ऑनस्क्रीन एकत्र दिसणारी जोडी पुढे खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याची काही उदाहरणं इंडस्ट्रीत पाहायला मिळतात. अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण या दोघांचा साखरपुडा अलीकडेच पार पडला
Maharashtra Times 8 Aug 2018, 7:27 am