सलमान खानच्या 'दबंग ३'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर झळकणार असल्यानं मराठी प्रेक्षक तिला पाहण्यासाठी खास उत्सुक आहेत. ट्रेलर लाँचच्या वेळी ती पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आली. तेव्हा तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सची झुंबड उडाली होती. सई काहीशी भांबावलेली असताना, खुद्द सलमान तिला मार्गदर्शन करत होता. कुठे पाहायचं, कशी पोझ द्यायची हे सगळं सल्लू तिला त्याच्या दबंग अंदाजात तिला सांगत होता.
सलमान खानचा‘दबंग’ अंदाज
सलमान खानच्या 'दबंग ३'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर झळकणार असल्यानं मराठी प्रेक्षक तिला पाहण्यासाठी खास उत्सुक आहेत.
महाराष्ट्र टाइम्स 26 Oct 2019, 8:41 am