लोकांना मनसोक्त थिरकायला लावणारी दांडिया क्वीन फाल्गूनी पाठक मराठी नाटकावर खूश आहे. अलीकडेच ती 'आमच्या हीचं प्रकरण' हे नाटक पाहायला गेली होती. हे कॉमेडी नाटक तिला आवडलं. प्रयोग संपल्यानंतर तिनं नाटकातल्या कलाकारांशी संवाद साधला आणि नाटकाचं कौतुकही केलं. सोशल मीडियावर तिनं कलाकारांबरोबरचा रंगमंचावरील फोटो पोस्ट केला होता. त्यासोबत, 'या नाटकानं मला खूप हसवलं. मला हे नाटक पाहून खूप आनंद झाला' अशी ओळही तिनं लिहिली होती.
नाटकानं हसवलं
लोकांना मनसोक्त थिरकायला लावणारी दांडिया क्वीन मराठी नाटकावर खूश आहे अलीकडेच ती 'आमच्या हीचं प्रकरण' हे नाटक पाहायला गेली होती...
Maharashtra Times 2 Aug 2018, 9:09 am