इंडस्ट्रीत काही दिग्दर्शक असे आहेत ज्यांच्याबरोबर काम करण्यास कलाकार खूप उत्सुक असतात. अभिनेत्री सुरवीन चावलाही दिग्दर्शक सुजॉय घोषबरोबर काम करण्यासाठी अशीच इच्छूक होती. दोन वर्षांपूर्वी तिनं सुजॉयकडे त्याबाबत विचारणाही केली. पण त्याच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिनं ही आशा सोडून दिली. आता दोन वर्षांनंतर सुजॉयनं तिच्याशी स्वत:हून संवाद साधत तिला एका शॉर्टफिल्मची ऑफर दिलीय. लवकरच ती 'कॉपी' या लघुपटात दिसेल. म्हणतात ना सब्र का फल...
सब्र का फल...
इंडस्ट्रीत काही दिग्दर्शक असे आहेत ज्यांच्याबरोबर काम करण्यास कलाकार खूप उत्सुक असतात...
Maharashtra Times 24 Apr 2018, 5:00 am