सुबोध भावेबरोबर ही छोटी मुलगी कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर ही आहे गायत्री दातार. गायत्री म्हणजे 'तुला पाहते रे'मधली ईशा. ईशाची गोष्ट विलक्षण आहे. एका स्पर्धेमध्ये विजेती ठरलेल्या गायत्रीला काही वर्षांपूर्वी सुबोधच्या हस्ते बक्षीस स्वीकारण्याचा योग आला होता. तेव्हा तिनं सुबोधसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिचं हे स्वप्न सत्यात उतरलेलं सध्या आपण पाहतोय. 'दुनिया गोल है' असं सुबोधनं या फोटोच्या ओळीत म्हटलं आहे.
दुनिया गोल आहे
सुबोध भावेबरोबर ही छोटी मुलगी कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही आहे गायत्री दातार गायत्री म्हणजे 'तुला पाहते रे'मधली ईशा...
Maharashtra Times 8 Sep 2018, 4:00 am