गायक-अभिनेता लकी अली यानं अलीकडेच 'डिअर केमोथेरपी, तू कधीच एकमात्र उपाय नसायला हवा होतास' असं ट्विट केलं. इरफान, सोनाली यांच्यानंतर आता लकीलाही या दुर्धर रोगानं ग्रासलं की काय अशी चर्चा सुरू झाली. चाहते याबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच, त्यानं फेसबुकवर एक पोस्ट टाकत म्हटलं की, 'देवाच्या कृपेनं माझी तब्येत बरी आहे. तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि दाखवलेलं प्रेम यासाठी सर्वांचे खूप आभार. मी केमोथेरपीबद्दलचं ट्विट आताच्या काही तरुणांसाठी टाकलंय जे व्यसनांमुळे कर्करोगाला बळी पडताहेत.'
ट्विटची चर्चा
ट्विटची चर्चागायक-अभिनेता लकी अली यानं अलीकडेच 'डिअर केमोथेरपी, तू कधीच एकमात्र उपाय नसायला हवा होतास' असं ट्विट केलं...
Maharashtra Times 24 Jul 2018, 4:00 am