भूमिका जिवंत करण्यासाठी कलाकार जीवाचं रान करतात. सुशांत सिंग राजपूतचा 'केदारनाथ' हा चित्रपट लवकरच येतोय. या सिनेमामध्ये त्यानं पिठूची भूमिका केली आहे. पिठू म्हणजे केदारनाथला आलेल्या भाविकांना आपल्या पाठीवरुन दर्शनाला घेऊन जाणारा. हे मंदिर उंचावर असल्यामुळे पिठू त्यांना घेऊन जातो. सुशांतनं त्यासाठी साठ-सत्तर किलो वजनाच्या माणसांना अशा प्रकारे घेऊन जाण्याचा सराव केला. तसंच त्या भूमिकेसाठी त्यानं केदारनाथमधल्या बाजारपेठेतूनच कपडे खरेदी केले होते.
पिठूसाठी बरंच काही
भूमिका जिवंत करण्यासाठी कलाकार जीवाचं रान करतात सुशांत सिंग राजपूतचा 'केदारनाथ' हा चित्रपट लवकरच येतोय...
Maharashtra Times 23 Nov 2018, 4:00 am