अ‍ॅपशहर

‘लेफ्ट’मुळेच मिळाली ‘गुलाम’

'मैं ना भुलूंगी' या मालिकेत अभिनेता विकास मानकटला चमकला होता. मात्र त्याची खरी ओळख म्हणजे 'लेफ्ट राईट लेफ्ट'मधला हुडा अशी. या हरयाणवी भूमिकेतून त्यानं देशभरातल्या तरुणाईची मनं जिंकली होती. या मालिकेनंच त्याला लोकप्रियताच नव्हे तर नवीन मालिकाही मिळवून दिलीय म्हणे. लवकरच हा दिल्लीचा पंजाबी मुंडा 'गुलाम' या नव्या मालिकेत दिसणार आहे.

Maharashtra Times 10 Jan 2017, 12:45 am
'मैं ना भुलूंगी' या मालिकेत अभिनेता विकास मानकटला चमकला होता. मात्र त्याची खरी ओळख म्हणजे 'लेफ्ट राईट लेफ्ट'मधला हुडा अशी. या हरयाणवी भूमिकेतून त्यानं देशभरातल्या तरुणाईची मनं जिंकली होती. या मालिकेनंच त्याला लोकप्रियताच नव्हे तर नवीन मालिकाही मिळवून दिलीय म्हणे. लवकरच हा दिल्लीचा पंजाबी मुंडा 'गुलाम' या नव्या मालिकेत दिसणार आहे. यातही तो हरयाणवी भूमिकेतच आहे. 'लेफ्ट..'मुळेच ही भूमिका मला मिळाली असं तो सांगतो. यापूर्वी मिस्टर इंडिया ठरलेला विकास या नव्या भूमिकेत काय कमाल दाखवतो याकडे त्याच्या चाहत्यांचं आता लक्ष असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज