'तुमच्यासाठी काय पण' म्हणत 'कुलस्वामिनी' फेम अभिनेता संग्राम साळवी घराघरांत पोहचला. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोत तो रडतोय. का? कारण त्याला केस कापावे लागत आहेत. केसांवर प्रेम असलेल्या संग्रामच्या मनाविरुद्ध ही कृती झाल्याचं दिसतं. तो रडत असला तरी होणारी बायको खुशबू तावडे मात्र त्याच्या या नवीन लूकवर फिदा झालेली दिसतेय. संग्रामच्या या फोटोवर तिनं चक्क फ्लाइंग किसचा स्मायली टाकलाय.
केसांसाठी काय पण
'तुमच्यासाठी काय पण' म्हणत 'कुलस्वामिनी' फेम अभिनेता संग्राम साळवी घराघरांत पोहचला. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोत तो रडतोय. का? कारण त्याला केस कापावे लागत आहेत.
Maharashtra Times 3 Nov 2017, 12:48 am