टीव्हीच्या पडद्यावरुन थेट बॉलिवूडमध्ये झळकलेली अंकिता लोखंडेचा नवा चित्रपट येतोय. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या 'बागी ३' या आगामी सिनेमात ती दिसेल. यातली तिची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं बोललं जातंय. अंकितानं 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'मधून रुपेरी पडद्यावर एंट्री केली होती. या सिनेमात तिनं झलकारी बाईची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं. आता तिच्या चाहत्यांना प्रतीक्षा असेल 'बागी ३'ची.
‘बागी ३’मध्ये चमकणार
टीव्हीच्या पडद्यावरुन थेट बॉलिवूडमध्ये झळकलेली अंकिता लोखंडेचा नवा चित्रपट येतोय...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2019, 4:00 am