'मराठी सिनेमात काम करणार का?' असा प्रश्न कोणत्याही अमराठी कलाकाराला विचारला की; 'चांगला सिनेमा असेल तर नक्की करेन' हे उत्तर ठरलेलं असतं. तापसी पन्नूचं यावरचं उत्तम मात्र वेगळं आहे. 'जोवर मराठी उत्तम बोलता येत नाही तोवर मी मराठी सिनेमात काम करणार नाही' असं तिनं स्पष्ट केलं आहे. कोणत्याही प्रादेशिक भाषेतल्या सिनेमात काम करण्यासाठी ती भाषा पूर्णपणे आत्मसात करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं, असं ती म्हणते.
आधी भाषा शिकणार
'मराठी सिनेमात काम करणार का?' असा प्रश्न कोणत्याही अमराठी कलाकाराला विचारला की; 'चांगला सिनेमा असेल तर नक्की करेन' हे उत्तर ठरलेलं असतं...
Maharashtra Times 12 Dec 2018, 4:00 am