अ‍ॅपशहर

जस्सी गिलचे 'दिल तुटडा' ऐका फक्त 'गाना'वर!

'गाना' या भारतातील लोकप्रिय म्युझिक अॅपने पंजाबी युथ आयकॉन जस्सी गिलशी करार केला आहे. गानाने पुढील सहा महिन्यांसाठी जस्सीच्या 'दिल तुटडा' या गाण्याचे ऑनलाइन म्युझिक स्ट्रीमिंग हक्क विकत घेतले आहेत.

Maharashtra Times 8 Jul 2017, 10:30 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gaana signs exclusive alliance for jassi gills latest track dill tutda
जस्सी गिलचे 'दिल तुटडा' ऐका फक्त 'गाना'वर!


'गाना.डॉट कॉम' या भारतातील लोकप्रिय म्युझिक अॅपने पंजाबी युथ आयकॉन जस्सी गिलशी करार केला आहे. गानाने पुढील सहा महिन्यांसाठी जस्सीच्या 'दिल तुटडा' या गाण्याचे ऑनलाइन म्युझिक स्ट्रीमिंग हक्क विकत घेतले आहेत.

पंजाबी सिनेमातील सुपरस्टार, उत्तम परफॉर्मर असलेला जस्सी गिलचे नवीन गाणे सोशल मीडियावर आधीच ट्रेडिंगमध्ये आले आहे. दोन आठवड्यांच्या आतच या पंजाबी गाण्याने १५ लाख हिट्सचा टप्पा पार केला आहे.

'जस्सी गिल हा एक प्रतिभावान आणि अष्टपैलू गायक आहे. बापू जिमीदार, स्नॅपचॅट यासारखी ठेका धरायला लावणारी गाणी असोत वा एक साल, प्यार मेरा, गबरू अशी हृदयाला भिडणारी गाणी त्याने दिली आहेत' असे 'गाना'चे सीओओ प्रशन अगरवाल यांनी नमूद केले.

'गाना हे सर्वात मोठे म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून त्यांच्यासोबतच्या या नव्या भागीदारीसाठी मी खूप उत्सुक आहे. दिल तुटडा या माझ्या नव्या गाण्याला रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. सर्वजण या गाण्याशी जोडले जातील ' असा विश्वास जस्सी गिल याने व्यक्त केला.

'गाना'वर हे गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा : http://gaana.com/song/dill-tutda

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज