अ‍ॅपशहर

गिफ्ट दे आनंदाचं!

लाल-पांढऱ्या कपड्यांतल्या सांताक्लॉजची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत असतो. सगळ्यांसाठी भरपूर गिफ्ट्स आणणारा सांता जर तुमच्यासमोर आला, तर तुम्हाला त्याच्याकडून काय गिफ्ट हवं असेल ते मटानं काही सेलिब्रिटींनाच विचारलं.

Maharashtra Times 24 Dec 2016, 2:35 am
लाल-पांढऱ्या कपड्यांतल्या सांताक्लॉजची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत असतो. सगळ्यांसाठी भरपूर गिफ्ट्स आणणारा सांता जर तुमच्यासमोर आला, तर तुम्हाला त्याच्याकडून काय गिफ्ट हवं असेल ते मुंटानं काही सेलिब्रिटींनाच विचारलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gift from santaclause
गिफ्ट दे आनंदाचं!


मायरासाठी आनंद
एरवी वर्षभर आपण सतत चवदार पदार्थ, कपडे, घड्याळ, कपडे असं खूप काही मागतच असतो. पण यंदा मला सांताकडून फक्त आणि फक्त माझी मुलगी मायरासाठी आनंद हवा आहे. आता ती जवळपास आठ महिन्यांची झाली आहे. तिच्या आनंदातच आमचं सारं विश्व सामावलेलं आहे. सध्या तरी आम्हाला बाकी दुसरं काही नको. पहिलंच वर्ष असल्यानं ख्रिसमसनिमित्त मी मित्र परिवारासह तिला चर्चमध्ये मासलाही घेऊन जाणार आहे.
- स्वप्नील जोशी

निळ्या रंगाची गाडी
जो जन्माला येतो त्याला कधी ना कधी परत जावंच लागतं हे माझे बाबा मला नेहमीच सांगत आले आहेत. तरीसुद्धा मला सांताकडून देवाघरी गेलेले माझे ताई-बाबा परत पाहिजेत. मी त्यांना खूप मिस आणखी काही वस्तूच मागायची झाली तर मला निळसर रंगाच्या छटेची नवीकोरी गाडी हवी आहे. परवाच मी एका मॉलमध्ये गाडीचं हे नवीन मॉडेल बघितलं आहे. भविष्यात सांतानं मला जर मला ही गाडी दिली तर माझा ख्रिसमस खरंच मेरी होईल.
- हेमांगी कवी

डायरीची भेट हवी
आजवर ख्रिसमसनिमित्त मला बहुतेक वेळा पेन, कॉस्मेटिक्स अशी गिफ्ट्स मिळाली आहेत. मी सगळ्या भेटवस्तू जपून ठेवते. यंदा मात्र सांतानं मला एक छानशी डायरी गिफ्ट करावी अशी इच्छा आहे. यामागचं कारण म्हणजे मला स्टेशनरी गोळा करण्याची फार आवड आहे. रंगीबिरंगी वह्यांमधल्या पानांचा तो फील खूप भारी वाटतो. तसंच मला एखादी गोष्ट आवडली, तर त्याची नोंद करायची सवय आहे. म्हणून सांताकडून नवीन डायरी मिळायला हवी.
- अनिता दाते

बाप्पा माझा सांता
मला रेंज रोव्हर ही गाडी खूप आवडते. सांतानं ती मला दिली तर खूप मजा येईल. पण त्याहीपेक्षा मला हवीय ती हिंमत. माझ्यासाठी माझा बाप्पा हाच माझा सांता आहे. त्यामुळे सांताकडे मी आयुष्यात पुढे येणाऱ्या प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाण्यासाठी हिंमत दे असं सांगेन.
- अमृता खानविलकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज