अ‍ॅपशहर

हिंदी 'सैराट'ला अखेर मुहूर्त मिळाला!

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट'ने केवळ मराठीच नाही तर तमाम भाषांमधील प्रेक्षकांना 'याड लावलं'. सैराटचे 'झिंगाट' यश पाहून बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे हक्क विकत घेत चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याची घोषणाही केली. परंतु, अनेक अडचणींमुळे 'सैराट'च्या या हिंदी रिमेकला मुहूर्त काही मिळत नव्हता. मात्र, आता सगळ्या अडचणींतून मार्ग काढत करणच्या हिंदी 'सैराट'च्या चित्रीकरणाला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Maharashtra Times 6 Nov 2017, 10:00 am
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindi sairat will go on floors in december
हिंदी 'सैराट'ला अखेर मुहूर्त मिळाला!

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट'ने केवळ मराठीच नाही तर तमाम भाषांमधील प्रेक्षकांना 'याड लावलं'. सैराटचे 'झिंगाट' यश पाहून बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे हक्क विकत घेत चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याची घोषणाही केली. परंतु, अनेक अडचणींमुळे 'सैराट'च्या या हिंदी रिमेकला मुहूर्त काही मिळत नव्हता. मात्र, आता सगळ्या अडचणींतून मार्ग काढत करणच्या हिंदी 'सैराट'च्या चित्रीकरणाला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं ‘सैराट’चे हक्क विकत घेतल्यानंतर आर्ची आणि परश्याची सुपरहिट जोडी पडद्यावर कोण साकारणार, याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. बॉलिवूडमधील अनेक चेहरे या भूमिका मिळवण्याच्या शर्यतीत होते. आर्ची-परश्याच्या जोडीसाठी अनेक नावे समोरही आली. मात्र, या सगळ्यांना मागे टाकत श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा भाऊ ईशान खत्तर या दोघांनी यात बाजी मारलीय.

'सैराट'च्या रिमेकमधून जान्हवी कपूर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सैराट’च्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. याआधी शशांकनं ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा 'सैराट' हिंदीमध्ये काय करतो, याबद्दल उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज