अ‍ॅपशहर

'मी शाहरुख खान आहे, इतरांसारखा का बनू?'

'मी शाहरुख खान आहे. मला इतरांसारखं बनण्याची किंवा त्यांच्याशी स्वत:ची तुलना करण्याची गरज वाटत नाही. बॉलिवूडमधील इतर कलाकारांकडून मी प्रभावित झालो तर माझ्या स्टारपदाला अर्थ काय?,' असा रोकठोक सवाल अभिनेता शाहरुख खान यानं केला आहे.

Maharashtra Times 23 Oct 2017, 12:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i am shah rukh khan why should i want to be someone else said shah rukh khan
'मी शाहरुख खान आहे, इतरांसारखा का बनू?'


'मी शाहरुख खान आहे. मला इतरांसारखं बनण्याची किंवा त्यांच्याशी स्वत:ची तुलना करण्याची गरज वाटत नाही. बॉलिवूडमधील इतर कलाकारांकडून मी प्रभावित झालो तर माझ्या स्टारपदाला अर्थ काय?,' असा रोकठोक सवाल अभिनेता शाहरुख खान यानं केला आहे.

तब्बल २५ वर्षे बॉलिवूडमध्ये राहूनही इतर कलाकारांच्या प्रभावापासून दूर राहणं कसं शक्य होतं, या प्रश्नावर शाहरुखनं वरील प्रतिक्रिया दिली. 'कुठल्याही अहंकारातून मी बोलत नाही. पण मला इतरांकडं बघण्याची गरज वाटत नाही. आज असे अनेक लोक आहेत ज्यांना शाहरुख खान बनायचं आहे. असं असताना मी इतरांसारखा बनण्याची इच्छा का बाळगावी,' असं तो म्हणाला.

'चित्रपटसृष्टीत पर्दापण केलं तेव्हा मी कुणीच नव्हतो. पैसे नव्हते. राहायला घर नव्हतं. कसलंही भविष्य नव्हतं. आई-वडील नसताना मी इथं आलो. जे योग्य वाटलं ते करत गेलो. माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नव्हतं. आज माझ्याकडं खूप काही आहे. इतकं काही मिळवलंय की ठरवलं तरी संपणार नाही. माझ्या समकालीन कलाकारांच्या कामाचं मला कौतुक आहेच; पण मला जे करावंसं वाटतं ते करायला मिळालं की मला खरा आनंद मिळतो,' असं शाहरुख म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज