अ‍ॅपशहर

एकटेपणा नकोसा झालाय: अँजेलिना जोली

अभिनेता ब्रॅड पिटपासून वेगळी झाल्यानतंर अभिनेत्री अँजेलिना जोलीला एकटेपणा नकोसा झालाय. 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत तिने एकटेपणावर भाष्य केले आहे.

Maharashtra Times 5 Sep 2017, 3:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त ।मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i do not enjoy being single said angelina jolie
एकटेपणा नकोसा झालाय: अँजेलिना जोली


अभिनेता ब्रॅड पिटपासून वेगळी झाल्यानतंर अभिनेत्री अँजेलिना जोलीला एकटेपणा नकोसा झालाय. 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत तिने एकटेपणावर भाष्य केले आहे.

'मी एकटेपणामुळे नाखूश आहे, हे खूप कठीण आहे. मला हे सगळ नको होतं,' अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' या वृत्तपत्राला मुलाखत देताना ती बोलत होती. तिने सांगितले की मागील वर्षात मी मुलांच्या संगोपनात अधिक वेळ घालवला होता.

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली दोन वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. डिसेंबरमध्ये अँजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज