अ‍ॅपशहर

बॉलिवूडला हवाय चायनीज तडका!

भारताचे पाकसोबत असलेले संबंध ताणले गेलेत. त्याचा परिणाम भारतीय सिनेसृष्टीवर झाला आहे. त्याचवेळी चीनने पाकची बाजू घेतल्यामुळे भारतीयांच्या मनात चीनबद्दलही नाराजी आहे. असं चित्र असताना, भारत चीन सिनेसृष्टीने मात्र एकमेकांचा हात धरायला सुरुवात केली आहे.

Maharashtra Times 18 Oct 2016, 12:39 am
>> Mrinmayi.Natu@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indo chinese alliance of bollywood
बॉलिवूडला हवाय चायनीज तडका!


Tweet : @MrinmayiMT

भारताचे पाकसोबत असलेले संबंध ताणले गेलेत. त्याचा परिणाम भारतीय सिनेसृष्टीवर झाला आहे. त्याचवेळी चीनने पाकची बाजू घेतल्यामुळे भारतीयांच्या मनात चीनबद्दलही नाराजी आहे. असं चित्र असताना, भारत चीन सिनेसृष्टीने मात्र एकमेकांचा हात धरायला सुरुवात केली आहे.

नोव्हेंबरमध्ये शाहरुख खानचा 'फॅन' चीनमध्ये प्रदर्शित होतोय. गेल्या काही महिन्यांपासून अनेक भारतीय चित्रपट चीनमधल्या विविध शहरांत प्रदर्शित होतायंत. अनेक इंडो-चायनीज प्रोजेक्ट आकार घेऊ लागलेत. दोन्ही देशांमधले सांस्कृतिक संबंध एकिकडे सुधारु लागले आहेत हे खरंच आहे. पण, चीनने आपली भूमिका बदलली नाही, तर मात्र या सगळ्या घडामोडींवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चीनमधली भारतीय चित्रपटांची उत्सुकता वाढते आहे. म्हणूनच पीके, धूम, थ्री इडियट्स, माय नेम इज खान, क्रिश ३ असे सिनेमे चिनी लोकांमध्ये तुफान लोकप्रिय झाले. 'पीके'च्या चिनी डब व्हर्जननं तर चक्क चीनमध्येही शंभर कोटींचा आकडा पार केला. आता चिनी चाहत्यांना 'फॅन'ची उत्सुकता आहे. यापलिकडे जात कबीर खानने आपल्या ट्युबलाइटमध्ये चीनी अभिनेत्री झू झू ला घेतलं. ती सलमानसोबत या सिनेमात दिसेल. अनेक मोठ्या कंपन्यांना चीनची बाजारपेठ आता महत्त्वाची वाटू लागली आहे. इरॉसच्याच ‘ट्रिनिटी पिक्चर्स’नं चीनमधल्या पिकॉक माउंटन कल्चर आणि हुआक्झिया फिल्म डिस्ट्रिब्युशन कंपनी या दोन प्रोडक्शन्ससोबत मिळून सहनिर्मिती करण्याचे जाहीर केलंय. ‘कुंग फू योगा’ या एका इंडो-चायनीज प्रोजेक्टची सिनेसृष्टीत जोरात चर्चा आहे. या सिनेमात सोनू सूद, दिशा पाटानी यांसारखे बॉलिवूड स्टार्स आहेत. दोन्ही देशांतील समृद्ध संस्कृतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातल्या काही सीन्सचं शूटिंग भारतात झालंय. याची कोरिओग्राफी फराह खानने
केली आहे.

आकर्षणाची कारणे :

हॉलिवूडला मागे टाकायचे असल्यास बॉलिवूडला चीनसोबत हात मिळवणी करणे गरजेचे आहे.

कारण : - हजार कोटींचं प्रोडक्शन करण्यासाठी सहनिमिर्ती हाच पर्याय

चीनमध्ये भारताच्या तुलनेत पाच पटीनं अधिक स्क्रीन्स

चीनमधील प्रेक्षक तरुणवर्गात मोडतो.

मराठीचा पहिला बहिष्कार

वैभव लोंढेच्या 'भिजलेली तू’ या गाण्यातून ‘पावर ब्रीज एंटरटेनमेंट आशिया प्रा. लि’ या इंडो–चायना कंपनीनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्याचवेळी इनटॉलरन्स या लघुपटाने मात्र चीनमध्ये होणाऱ्या महोत्सवातून माघार घेत पहिला निषेध नोंदवला आहे. गिरीश नाईक दिग्दर्शित निनाद देशपांडे अभिनित या लघुपटाची चीनमधल्या महोत्सवात निवड झाली होती.

भारतीय चित्रपटांसाठी चीन हे महत्त्वाचं मार्केट आहे. येत्या काळात सहनिर्मिती करताना आम्हाला खूप आनंद होतोय. भाषेचं बंधन नसलेल्या चांगल्या कथा आम्हाला दाखवायच्या आहेत.

- ज्योती देशपांडे, ग्रुप सीइओ, इरॉस इंटरनॅशनल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज