अ‍ॅपशहर

मला त्यांच्या नवऱ्यात इंटरेस्ट नाहीः सनी लिओनी

पती-पत्नींचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. ज्या पती-पत्नींचं नातं मजबूत नसतं ते नातं असुरक्षित असतं. माझा पती हॉट आहे. मला दुसरीच्या नवऱ्याकडे जाण्याची गरज नाही. मला त्यात जराही इंटरेस्ट नाही, असं बिनधास्त मत पूर्वाश्रमीची 'पॉर्न स्टार' व बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनीनं व्यक्त केलंय.

Maharashtra Times 22 Dec 2016, 9:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम interview with sunny leone over acting in shah rukh starer raees
मला त्यांच्या नवऱ्यात इंटरेस्ट नाहीः सनी लिओनी


पती-पत्नींचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. ज्या पती-पत्नींचं नातं मजबूत नसतं ते नातं असुरक्षित असतं. माझा पती हॉट आहे. मला दुसरीच्या नवऱ्याकडे जाण्याची गरज नाही. मला त्यात जराही इंटरेस्ट नाही, असं बिनधास्त मत पूर्वाश्रमीची 'पॉर्न स्टार' व बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनीनं व्यक्त केलंय.

शाहरुख खानचा बहुचर्चित 'रईस' या चित्रपटात सनी लिओनीचं 'आयटम साँग' असून या गाण्याच्या निमित्तानं सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या गाण्यासाठी तिला ४ कोटी रुपये दिल्याचीही चर्चा आहे. 'रईस' मधील 'लैला ओ लैला' या गाण्यावर सनी थिरकताना दिसणार आहे. हे गाणं शूट करण्यासाठी सनीला ४ दिवस लागले आहेत. माझ्या भूतकाळामुळे लोक माझ्यासोबत काम करत नव्हते. परंतु आता मला बॉलिवूडचा बादशाह शाहरुखसोबत काम करायला मिळाले आहे. त्यामुळे शाहरुखसोबत काम करण्याचं माझं स्वप्नं साकार झाल्याचे सनी सांगते.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेते तुझ्यासोबत काम करण्यास नकार देतात?. कारण त्यांच्या बायका त्यासाठी परवानगी देत नाहीत?, असं एका मुलाखतीत तू सांगितलं तर ते कितपत खरं आहे?, असा प्रश्न विचारल्यावर सनी म्हणाली की, हे सर्व त्या-त्या कलाकारांवर अवलंबून आहे. शाहरुख खान आणि गौरी यांच्यातील नातं खूप मजबूत आहे. ज्यावेळी पती-पत्नींचं नातं मजबुत नसते तेव्हा ते असुरक्षित होते. अनेक अभिनेते माझ्यासोबत काम करण्यास नकार देतात कारण त्यांना त्यांच्या बायका परवानगी देत नाही, हे खरं आहे. परंतु त्यांना कसं सांगू की, मला कोणाच्याही नवऱ्यात जराही इंटरेस्ट नाही. मला नवरा असून तो खूप हॉट आहे. मला कोणाच्याही पतीकडे जाण्याची गरज नाही. माझा पती दिवस-रात्र माझ्यासोबत राहतो, हे सांगायलाही सनी विसरली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज