अ‍ॅपशहर

हिंसेचा व्हिडीओ चुकून लाइक;अक्षय कुमार ट्रोल

या आंदोलनात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारलाही ट्रोल व्हावं लागलं आहे. याचं कारण म्हणजे दिल्लीतील ‘जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडीओ अक्षय कुमारच्या ट्विटर हँडलवरुन लाइक करण्यात आला. पण हा व्हिडीओ चुकून लाइक झाला होता, असं स्पष्टीकरण अक्षय कुमारने दिलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2019, 4:35 pm
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाने देशभरातील विविध ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. विशेष म्हणजे काही प्रमुख विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. या आंदोलनात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारलाही ट्रोल व्हावं लागलं आहे. याचं कारण म्हणजे दिल्लीतील ‘जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडीओ अक्षय कुमारच्या ट्विटर हँडलवरुन लाइक करण्यात आला. पण हा व्हिडीओ चुकून लाइक झाला होता, असं स्पष्टीकरण अक्षय कुमारने दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akshay kumar


जामिया हिंसाचार: मोदींचं शांततेचं आवाहन

दिल्लीतील जामियानगरमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला, ज्यात विद्यार्थ्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आणि जाळपोळही करण्यात आली. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ अक्षय कुमारच्या ट्विटर हँडलवरुनही लाइक करण्यात आला. यानंतर अक्षय कुमारवर नेटिझन्सनी टीकेचा भडीमार केल्यानंतर त्याने ट्वीट करत यावर स्पष्टीकरण दिलं.

‘जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांच्या व्हिडीओला लाइक केल्याबद्दल सध्या जे काही सुरू आहे, ती माझी चूक होती. ट्विटरवर स्क्रोलिंग करत असताना नाकळतपणे ट्वीट लाइक झालं, चूक लक्षात येताच तातडीने ते ट्वीट अनलाइक करण्यात आलं. मी अशा घटनांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देत नाही,’ असं स्पष्टीकरण अक्षय कुमारने दिलं.
पाहाः आंदोलनावेळी कार्यकर्त्याची पँट पेटली
दरम्यान, यानंतर IsupportAkshayKumar असाही ट्रेंड अक्षय कुमारच्या चाहत्यांना चालवला. अक्षय कुमारने चूक मान्य केल्यानंतरही त्याला ट्रोल केलं जात होतं. यानंतर अक्षय कुमारचे चाहते मैदानात उतरले आणि त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज