अ‍ॅपशहर

सलमानच्या 'ट्यूबलाइट'चा टीजर आला

अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'ट्यूबलाइट' चित्रपटाचा टीजर आज झळकला असून या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान याने या टीजरची लिंक आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. 'ईद मनाओ, ट्यूबलाइट के साथ' असं खास आवाहन कबीरने या ट्विटमध्ये केलं आहे. या टीजरने सलमानच्या 'ट्यूबलाइट'बाबतची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

Maharashtra Times 18 Apr 2017, 8:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kabir khan releases teaser of tubelight
सलमानच्या 'ट्यूबलाइट'चा टीजर आला


अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'ट्यूबलाइट' चित्रपटाचा टीजर आज झळकला असून या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान याने या टीजरची लिंक आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. 'ईद मनाओ, ट्यूबलाइट के साथ' असं खास आवाहन कबीरने या ट्विटमध्ये केलं आहे. या टीजरने सलमानच्या 'ट्यूबलाइट'बाबतची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

१४ सेकंदांचा हा टीजर आहे. यात बॅकग्राउंडला बच्चेकंपनीचा आवाज आहे. जलजा...जलजा असा त्यांचा कल्ला सुरू आहे. यादरम्यान स्क्रीनवर ट्यूबलाइट सुरू होतानाच लाइटचा लपंडावही सूचकपणे दाखवला गेला आहे. मात्र, यातून कोणताच क्ल्यू तुमच्या हाती लागणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.


Eid manao Tubelight ke saath! Follow @TubelightKiEid! #TubelightKiEid @BeingSalmanKhan @kabirkhankk @amarbutala https://t.co/3FwZ9vpioz — Kabir Khan (@kabirkhankk) April 18, 2017
हा चित्रपट भारत-चीन युद्धावर आधारित आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. यात सलमान जवानाच्या भूमिकेत आहे. चिनी अभिनेत्री झू झू चित्रपटात सलमानची नायिका आहे. याआधी सलमान आणि कबीर खानने 'बजरंगी भाईजान' आणि 'एक था टायगर' हे चित्रपट एकत्र बनवलेत आणि दोन्ही चित्रपट हिट ठरलेत.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज