अ‍ॅपशहर

असहिष्णुता म्हणजे ‘बाबाजी का ठुल्लू’च!: कपिल शर्मा

‘असहिष्णुता हा शब्द मी आधी कधीही ऐकला नव्हता. हा केवळ एक शब्द आहे. आम्ही विनोद करण्यासाठी जसं ‘बाबाजी का ठुल्लू’ हा शब्द वापरतो, तसाच हा शब्द आहे. फक्त त्याची मार्केटिंग उत्तम केली गेलीय,’ असं बिनधास्त मत ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’फेम कपिल शर्मा यानं मांडलं आहे.

Maharashtra Times 15 Apr 2016, 1:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kapil sharma talks about intolerance
असहिष्णुता म्हणजे ‘बाबाजी का ठुल्लू’च!: कपिल शर्मा


‘असहिष्णुता हा शब्द मी आधी कधीही ऐकला नव्हता. हा केवळ एक शब्द आहे. आम्ही विनोद करण्यासाठी जसं ‘बाबाजी का ठुल्लू’ हा शब्द वापरतो, तसाच हा शब्द आहे. फक्त त्याची मार्केटिंग उत्तम केली गेलीय,’ असं बिनधास्त मत ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’फेम कपिल शर्मा यानं मांडलं आहे.

‘कॉमेडी नाइट्स...’मधून बाजूला झाल्यानंतर कपिलचा नवा शो लवकरच टीव्हीवर येत आहे. त्या निमित्तानं ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना त्यानं नव्या शो बरोबरच विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. विनोदातून होणाऱ्या समज-गैरसमजाबाबत बोलताना त्यांना देशात अलीकडं गाजत असलेल्या असहिष्णुतेवरही भाष्य केलं. ‘असिहष्णुता या शब्दाची मार्केटिंग जबरदस्त झालीय. त्या पलीकडं त्यात काही नाही. आमच्या शोमध्ये थट्टा-मस्करी करताना आणि ‘बाबाजी का ठुल्लू’ हा शब्द वापरला आणि बघता-बघता तो लोकप्रिय झाला. असहिष्णुतेचंही असंच झालं. देशात असहिष्णुता आहे, असहिष्णुता आहे असं म्हणून हा शब्द प्रसिद्ध केला गेला. आता तर हा शब्द उच्चारला तरी लोक हसण्यावारी नेतात,’ असं निरीक्षण कपिलनं मांडलं.

...तरीही जपावं लागतंच!

‘भारतात विनोद करताना विचार करून काम करावं लागतं. कोण कुठल्या गोष्टीवरून दुखावलं जाईल सांगता येत नाही. इतकंच काय, एखाद्या विनोदामुळं तुरुंगातही जावं लागू शकतं,’ कपिल म्हणाला. ‘कोणत्याही धर्मावर विनोद करताना लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यावर आमचा कटाक्ष असतो,’ असंही त्यानं सांगितलं. ‘याउलट परदेशातील लोक कोणत्याही विनोदाला गंभीरपणे घेत नाहीत. ते त्याकडं निव्वळ विनोद म्हणूनच पाहतात. तिथं देवाची, अगदी राष्ट्रपतींचीही विनोदातून सर्रास खिल्ली उडवली जाते. त्यांचा हा दृष्टिकोन आपणही घ्यायला हवा,’ अशी अपेक्षा कपिलनं व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज