अ‍ॅपशहर

करिना अम्मी होणार, सैफू अब्बानं दिली गुडन्यूज

‘हो, करिना कपूर गरोदर आहे. डिसेंबरमध्ये तुम्हाला गुडन्यूज मिळेल!’ ही माहिती दिली आहे खुद्द सैफ अली खान यानं. गेल्या काही दिवसांपासून करिना कपूरकडं गुडन्यूज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. खान किंवा कपूर कुटुंबीयांकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नव्हती. करिनानं तर ‘लंडनमध्ये माझी पाच मुलं आहेत’ असं म्हणून हा प्रश्न उडवून लावला होता.

Maharashtra Times 2 Jul 2016, 3:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kareena kapoor khan is pregnant expecting baby in december confirms husband saif ali khan
करिना अम्मी होणार, सैफू अब्बानं दिली गुडन्यूज


‘हो, करिना कपूर गरोदर आहे. डिसेंबरमध्ये तुम्हाला गुडन्यूज मिळेल!’

ही माहिती दिली आहे खुद्द सैफ अली खान यानं. गेल्या काही दिवसांपासून करिना कपूरकडं गुडन्यूज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. खान किंवा कपूर कुटुंबीयांकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नव्हती. करिनानं तर ‘लंडनमध्ये माझी पाच मुलं आहेत’ असं म्हणून हा प्रश्न उडवून लावला होता.

सैफ अली खाननं मात्र थेट प्रसिद्धीपत्रक काढूनच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. डिसेंबरमध्ये आमच्या पहिल्या बाळाचं आगमन होईल, असं त्यानं पत्रकात म्हटलं आहे. ‘चाहत्यांचे प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. मीडियानं राखलेल्या संयमाबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो,’ असं त्यानं पत्रकात म्हटलं आहे.

सैफ तिसऱ्यांदा बाप होणार

करिनाचं पहिल्यांदाच आई होणार असली तरी सैफ अली खानचं हे तिसरं मुल असेल. सैफला आधीची पत्नी अमृता सिंग हिच्यापासून इब्राहीम व सारा ही दोन मुलं आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज