अ‍ॅपशहर

'या' अभिनेत्रीनं केली सलमानची कॉपी!

बॉलिवूडचा 'दबंग खान' सलमान खानचे जगभरात चाहते आहेत. आपल्या लाडक्या 'सल्लू'ने कोणतीही स्टाइल केली की लगेच चाहते त्याची कॉपी करतात. सलमानच्या बोलण्या-चालण्याचे दिवाणे झालेले चाहते सगळ्यांना माहीत आहेत. परंतु नुकत्याच एका कार्यक्रमात सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड कतरिना कैफनं चक्क त्याच्या चालण्याची नक्कल करत प्रेक्षकांना थक्क केलंय. सलमानची नक्कल करताना तिचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

Maharashtra Times 19 Nov 2017, 2:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम katrina copies salman khan
'या' अभिनेत्रीनं केली सलमानची कॉपी!


बॉलिवूडचा 'दबंग खान' सलमान खानचे जगभरात चाहते आहेत. आपल्या लाडक्या 'सल्लू'ने कोणतीही स्टाइल केली की लगेच चाहते त्याची कॉपी करतात. सलमानच्या बोलण्या-चालण्याचे दिवाणे झालेले चाहते सगळ्यांना माहीत आहेत. परंतु नुकत्याच एका कार्यक्रमात सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड कतरिना कैफनं चक्क त्याच्या चालण्याची नक्कल करत प्रेक्षकांना थक्क केलंय. सलमानची नक्कल करताना तिचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

कतरिना कैफ आणि सलमान खान हे सध्या आगामी ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभर फिरत आहेत. नुकतीच त्यांनी इंडियन सुपर लिगच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आणि प्रेक्षकांसाठी डान्सदेखील केला. डान्सनंतर या दोघांनीही स्टेडिअमवर येऊन प्रेक्षकांना भेट दिली. आपल्या चाहत्यांना अभिवादन करण्याच्या गडबडीत सलमान असताना कतरिनाने हळूच त्याच्या चालण्याची नक्कल केली. सलमान-कतरिनाच्या चाहत्यांनी मात्र लगेच संधी साधत हा क्षण टिपला आणि कतरिनाच्या फॅन्सनी तयार केलेल्या पेजवर तो शेअरही केला.
Instagram Story | Katrina Kaif's mimics Salman Khan's walk 😂❤ #ISL2017 pic.twitter.com/5yUvDnRgpA — Katrina Kaif Fans (@KatrinaKaifTeam) November 17, 2017
सलमान आणि कतरिना ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच ‘टायगर झिंदा है’च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ‘ऑनस्क्रीन केमिस्ट्री’विषयी बी-टाऊनमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज