मुंबई:
युट्यूबच्या जगाची ओळख असणाऱ्या आणि लिली सिंगचे नाव न ऐकलेल्या व्यक्ती मिळणे तसे कठीणच. युट्यूब स्टार 'सुपरवुमन' अर्थात लिली सिंग हिनं आपल्या लैंगिकतेबाबत मोठा खुलासा केला. आपण उभयलिंगी (बायसेक्शुअल) असल्याचं लिलीने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.
लिलीनं ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 'मी एक स्त्री आहे, परदेशात मोठी होणारी भारतीय आहे, उभयलिंगी आहे या गोष्टी माझ्या आयुष्यातील अडथळा आहेत असं आयुष्यभर मला अनेकांनी भासवलं. परंतु, या गोष्टी माझ्या आयुष्यातील अडथळे नसून माझ्याकडे असणाऱ्या 'सुपरपावर्स' आहेत यावर माझा ठाम विश्वास बसला आहे. त्यामुळे आता मी माझ्या अस्तित्वाचा खुलेपणानं स्वीकार करणार आहे. '
लिलीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले. जगभरातील 'एलजीबीटीक्यू' समुदायाने तिचे कौतुक केले.