अ‍ॅपशहर

क्लीन 'बोल्ड'... काय म्हणतायत अभिनेत्री?

प्रेक्षकांच्या लाडक्या अनेक मराठी अभिनेत्री सध्या त्यांच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत काही अभिनेत्रींनी पोस्ट केलेले बोल्ड फोटो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे त्यांनी 'मुंटा'शी शेअर केलं.

महाराष्ट्र टाइम्स 10 Feb 2020, 11:02 am
शब्दुली कुलकर्णी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bold


प्रेक्षकांच्या लाडक्या अनेक मराठी अभिनेत्री सध्या त्यांच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत काही अभिनेत्रींनी पोस्ट केलेले बोल्ड फोटो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे त्यांनी 'मुंटा'शी शेअर केलं.

काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी याबाबत म्हणाली, की, 'कलाकारानं सतत नवीन प्रयोग केले पाहिजेत. अपडेटेड असणं ही काळाची गरज आहे. पण, हा नवा प्रयोग उथळ होणार नाही याची काळजी आम्ही घेतो.' तर बोल्ड फोटोनं नवीन वर्षाची सुरुवात करणारी अभिनेत्री रसिका सुनील सांगते की, 'बरेच महिने डाएट करुन शरीर सुडौल केलं आहे. माझा फिटनेस दाखवणं हा माझा हेतू होता. एक कलाकार म्हणून माझ्याकडून आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये याचा समावेश होतो.'

सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे मिताली मयेकरचा चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. याबाबत मिताली सांगते की, 'मी अशीच आहे आणि माझ्या जवळच्या लोकांना मला अशाच रुपात बघायला आवडतं. प्रोफाइलबरोबर प्रयोग करण्यात गैर काय? प्रेक्षकांच्या मनात माझी बालकलाकार म्हणून असलेली प्रतिमा मला बदलायची आहे.'

स्वत:वर नवा प्रयोग करून पाहायचा असल्यानं हे करून पाहिल्याचं अभिनेत्री पूजा सावंतनं सांगितलं.

प्रेक्षकांना मला सोज्ज्वळ, साजूक लूकमध्ये बघण्याची सवय झाली होती. आम्ही बोल्ड लूकही कॅरी करु शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं.

प्राजक्ता


कलाकारांसमोर सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोठं आव्हान आहे. भूमिकेसाठी आमचा विचार करताना आम्ही कोणत्याही बाबतीत कमी पडू नये असं वाटतं.

रसिका


सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल करणारी मंडळी बॉलिवूड अभिनेत्रींना बोल्ड अंदाजात बघणं पसंत करतात. मग आमचंच बोल्ड रुप त्यांना का खुपतं?

मिताली


बोल्ड रुपात मी चांगली दिसते की नाही, ते आपल्याला कॅरी करता येतंय की नाही हे मला पाहायचं होतं. म्हणून मी हा नवीन प्रयोग करुन बघितला.

पूजा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज