अ‍ॅपशहर

ठरलं! 'सैराट'ची आता मालिका बनणार

आर्ची-परश्याचे सुपरहिट डायलॉग्स असो किंवा 'झिंगाट'सारखी थिरकायला लावणारी गाणी नागराज मंजुळेच्या 'सैराट'नं चित्रपटसृष्टी गाजवली. मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटावर आधारित हिंदी मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे.

Natasha Coutinho | टाइम्स न्यूज नेटवर्क 13 May 2019, 9:17 am
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sairat


आर्ची-परश्याचे सुपरहिट डायलॉग्स असो किंवा 'झिंगाट'सारखी थिरकायला लावणारी गाणी नागराज मंजुळेच्या 'सैराट'नं चित्रपटसृष्टी गाजवली. मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटावर आधारित हिंदी मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे.

रुपेरी पडद्यावरील 'सैराट'च्या यशानंतर आता हा चित्रपट छोट्या पडद्यावर मालिकेच्या रुपात दिसणार आहे. या मालिकेचं नाव 'जात ना पूछो प्रेम की' असं असणार आहे. अभिनेता किंशूक वैद्य आणि अभिनेत्री प्रणाली राठोड या मालिकेत आर्ची आणि परशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आर्ची-परशाची ही कथा मालिकेत उत्तर प्रदेशमध्ये घडणार आहे.

सैराटवर आधारित मालिकेच्या वृत्ताला दुजोरा देत अँड टीव्हीचे विष्णु शंकर म्हणाले की, 'सैराट म्हणजे उत्कट प्रेमाची गोष्ट सांगणारी आणि त्याचबरोबर समाजातील भीषण जात वास्तव अधोरेखित करणारी अद्भूत कलाकृती आहे. मला असं वाटतं या चित्रपटातून मांडलेलं वास्तव प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपला संदेश घरोघरी पोहोचवायचा असेल तर टीव्हीसारखे दुसरं माध्यम नाही. त्यामुळे आम्ही सैराटवर आधारित मालिका बनवण्याचं ठरवलं.'असं शंकर म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज