अ‍ॅपशहर

'माई घाट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट!

मराठी चित्रपटांची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसत आहे. सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. 'माई घाट : क्राइम नं.१०३/२००५' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2019, 10:26 am
मुंबई: मराठी चित्रपटांची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसत आहे. सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. 'माई घाट : क्राइम नं.१०३/२००५' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2005 has bagged award at the singapore south asian international film festival
'माई घाट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट!


एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची हेलावणारी कथा असलेल्या 'माई घाट : क्राइम नं. १०३/२००५ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आठ देशातील चौदा चित्रपटांतून पहिल्या सहात निवड झाल्यानंतर 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'संकलन' व 'छायाचित्रण' असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार पटकावून बाजी मारलेला आजपर्यंतचा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही.


चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मोहिनी रामचंद्र गुप्ता या तरुणीनं या चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य उचललं आहे 'सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'माई घाट'नं सात विभागांमध्ये तब्बल सहा नामांकनं मिळवत 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट एडिटींग', 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी'चे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव हिनं या चित्रपटात आईची व्यक्तिरेखा साकारली केली असून सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत, डॅा. गिरीश ओक, विभावरी जोशी आणि विवेक चाबूकस्वार अशी कुशल मराठी कलाकारांची फळी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज