अ‍ॅपशहर

Amitabh BirthDay: शहेनशाह के साथ...

आयुष्यात एकदा तरी बिग बी यांना भेटता यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या एका वाढदिवशी बॉलिवूडच्या शहेनशाहला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. योगायोग म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. आज निशिगंधा वाड यांचा वाढदिवस असून त्या भेटीचा हा खास किस्सा...

Maharashtra Times 11 Oct 2018, 9:48 am
आयुष्यात एकदा तरी बिग बी यांना भेटता यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या एका वाढदिवशी बॉलिवूडच्या शहेनशाहला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. योगायोग म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. आज निशिगंधा वाड यांचा वाढदिवस असून त्या भेटीचा हा खास किस्सा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meeting with amitabh bachchan
Amitabh BirthDay: शहेनशाह के साथ...


लहानपणापासून बॉलिवूडचे शहेनशाह, अँग्री यंग मॅन, महानायक आणि चाहत्यांचे लाडके बिग बी यांचे चित्रपट बघत आले होते. त्यांचं काम बघून दिवसागणिक त्यांच्याप्रती असलेला आदर वाढतो. त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं अनोखं आहे की, बघणाऱ्याच्या मनात त्यांच्याप्रती आदराचं स्थान निर्माण होतं. याच लाडक्या बिग बी यांना माझ्या आणि त्यांच्या वाढदिवशी भेटता आलं. कारण आम्हा दोघांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. आणखीन एक योगायोग म्हणजे माझ्या वडिलांचा आणि अमिताभजींच्या वडिलांचा म्हणजे हरिवंश राय बच्चन यांचाही एकाच दिवशी वाढदिवस असतो. तर अमिताभजी आणि मी २०१६ साली 'वझीर' हा बॉलिवूडपट एकत्र करत होतो. माझ्या वाढदिवशीच त्याचं चित्रीकरण चालू होतं. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक बिजॉय नांबियार यांना माझा वाढदिवस आहे हे कळताच त्यांनी अमिताभजींशी माझी भेट घडवून दिली. त्या वाढदिवसाच्या आठवणी कधीच न विसरता येण्यासारख्या आहेत. आणखीन एका वाढदिवसाची आठवण म्हणजे एका नामांकित बँकेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात आलं होतं. तेव्हा त्या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलही उपस्थित राहणार होत्या हे मला माहीत नव्हतं. पण त्यांना मंचावर बघून सुखद धक्का बसला होता. योगायोग म्हणजे त्यादिवशी माझा वाढदिवसही होता. माझा वाढदिवस आहे हे तेथील आयोजकांना कळताच त्यांनी ते प्रतिभाताईंना सांगितलं. ताईंनी वेळ न दवडता त्या मंचावर आणि हजारो संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसमोर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तत्कालीन राष्ट्रपतींकडून शुभेच्छा मिळणं यासारखी दुसरी कोणतीही मोठी गोष्ट नाही.

शब्दांकन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज