मुंबईः
लैंगिक शोषणाच्या आरोपांनतर प्रसिद्ध संगीतकार अन्नू मल्लिक यांना 'इंडियन आयडॉल'च्या परीक्षक पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळं आता 'इंडियन आयडॉल'मध्ये अन्नू मलिकच्या जागी परीक्षक म्हणून गायक-संगीतकार सलीम आणि सुलेमान यांची वर्णी लागली असल्याचं समजतंय.
अन्नू मलिक आतापर्यंत 'इंडियन आयडॉल'मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. गायिता श्वेता पंडित आणि सोना मोहापात्रा आणि अन्य दोन महिलांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर सोनी वाहिनीनं अन्नू मलिक यांच्यावर कारवाई करत त्यांना परीक्षकाच्या पदावरून बडतर्फ केलं आहे. अन्नू मलिक यांना काढल्यानंतर आता परीक्षकाची जबाबदारी कोण सांभाळणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर वाहिनीनं प्रसिद्ध गायक -संगीतकार सलीम आणि सुलेमान या जोडीला या शोमध्ये सहभागी करून घेतलं असल्याचं बोललं जातंय.