अ‍ॅपशहर

पद्मावती आधी प्रदर्शित तर होऊ द्या: मनसे

पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणं ही चुकीची बाब असल्याचे नमूद करत मनसेने या चित्रपटाबाबत सावध भूमिका घेतली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह भाग असल्यास त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Times 15 Nov 2017, 5:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns support to padmavati
पद्मावती आधी प्रदर्शित तर होऊ द्या: मनसे


पद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणं ही चुकीची बाब असल्याचे नमूद करत मनसेने या चित्रपटाबाबत सावध भूमिका घेतली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह भाग असल्यास त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.

पद्मावती चित्रपटाला राजपूतांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटनांनी तसेच काही राजकीय पक्षांनीही तीव्र विरोध केला आहे. कोर्टाकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला असला तरी या चित्रपटाला असलेला विरोध मावळलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसेने मात्र चित्रपटाच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे.

पद्मावती चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे एखादा चित्रपट प्रदर्शित झालेला नसताना आणि त्यात नेमकं काय दाखवण्यात आलं आहे, हे न पाहताच त्याला विरोध करणं योग्य नाही. त्यामुळे हा चित्रपट आधी प्रदर्शित होऊ द्या. त्यानंतर या चित्रपटात काही आक्षेपार्ह असल्यास त्याबाबत आम्ही संजय लीला भन्साळी यांच्याशी चर्चा करू. त्यावर योग्य असा तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. केवळ विरोधासाठी विरोध करणं हे आम्हाला मान्य नाही. हा चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही, असेही खोपकर यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज